
वाई: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्त्यव्या बद्दल आक्रमक झालेले खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर ठोस कारवाईची मागणी केली आहे. खासदार उदयनराजे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे की, छत्रपती शिवाजी महाराज संपुर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. महाराष्ट्र तर त्यांना अस्मिता मानून आपली वाटचाल करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी स्वराज्याची स्थापना केली. तंजावरपासून अफगाणिस्तानपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर महाराजांनी समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार आपण पुढे नेत आहोत. गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे, हे अभिमानास्पद आहे. मात्र काही व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या आस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे.
यापूर्वीही राज्यपाल कोशारी यांनी समर्थ रामदास स्वामी गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केल होते. शिवाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यापुर्वी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. ही सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांचा जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वतः बदलायला तयार नाहीत. त्यांची महाराष्ट्रात अडीच वर्षे कारकिर्द होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील ते दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत. २०१४ साली आपण रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले होते. काही दिवसांपूर्वीच आपण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचा भव्य असा पायाभरणी समारंभ केलात. इतकच नाही तर भारतीय नौदालाचा ध्वज शिवरायांना अर्पण केलात. या निर्णयाने लाखो शिवप्रेमी आनंदलेले असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मात्र अशोभनीय वर्तन केले आहे, हे खेदाने नमूद करावे लागत आहे. या पार्श्वभुमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तातडीने राज्यपाल पदावरून दूर करावे, अशी आमची मागणी आहे. आपण यांवर योग्य ती कार्यवाही कराल याची मला खात्री आहे अशा आशयाचे पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देसन्द्र फडणवीस यांनाही त्याची प्रत पाठविली आहे.राज्यपाल कोश्यारी उद्या पासून दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यामुळे उदयनराजेंच्या पत्राला महत्व आले आहे.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


