सातारा : महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर टेम्पो चारशे फूट दरीत कोसळला; तीन गंभीर जखमी, दोन दिवसात दुसरी घटना

महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर चिखली शेड जवळ रात्री इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन निघालेला टेम्पोचा ब्रेक फेल होऊन चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो चारशे फूट दरीत कोसळला.या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाई येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील दोन दिवसात टेम्पोचा ब्रेक फेलहोऊन टेम्पो कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.

महाबळेश्वर तापोळा रस्त्यावरील चिखली शेडजवळ रविवारी रात्री टेम्पोचा ब्रेक फेल होऊन गाडी चारशे फूट खोल दरीत कोसळली.
इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन हा टेम्पो जात होता. अपघातानंतर हा टेम्पो झाडामध्ये अडकला. या टेम्पोमध्ये तीन युवक होते ते जखमी झाले आहेत. रात्रीच्या अंधारात यातील एक युवक झाड, फांद्यांच्या आधाराने मुख्य रस्त्यावर आला आणि अपघाताची माहिती त्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिली.

सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून त्यांना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारांसाठी दोघांना त्यांना वाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी या टेम्पोमधील फ्रिज टीव्ही आदी इलेकट्रीक वस्तू बाहेर काढण्याचे काम सुरु होते. दोन दिवसांपूर्वी मुकदेव घाटात टेम्पो दरीत कोसळून झालेल्या अपघातात लहान मुले, महिलांसह चाळीस मजूर जखमी झाले होते. महाबळेश्वर तालुक्यातील दोन दिवसांत घडलेली अपघाताची ही दुसरी घटना आहे.महाबळेश्वर येथून दहा किमी अंतरावर तापोळा मुख्य मार्गावर हा अपघात झाला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply