संतापजनक! अल्पवयीन मुलीवर आजोबासह तीन नातेवाईकांचा बलात्कार

पुण्यात ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्या भावाने, वडिलांनी, आजोबा आणि सख्खा मामाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत असताना हा प्रकरण समोर आले. याप्रकरणी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की पिडीत अल्पवयीन मुलीचे वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 2020 मध्ये पीडित मुलीवर मोठ्या भावाने तिच्यावर जबरदस्ती करत तिला धमकी देखील दिली होती तर आजोबांनी आणि मामांनी तिच्याबरोबर गैरवर्तन केले होते. सोबतच हा प्रकार तीन ते चार वर्षापासून सुरु असल्याचे तपासात समोर आले. मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत असताना अल्पवयीन लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली, याविषयी एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीसांना सांगितले. गेल्या तीन ते चार वर्षापासून वडील, भाऊ, आजोबा, मामा यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी मूळची बिहारची असून पुण्यात शिक्षणासाठी आली होती. या घटनेचा तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.  


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *