शिक्षक भरती संदर्भात शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा; गायकवाड म्हणाल्या..

मागील काही दिवसांपासून शिक्षक भरतीच्या मुद्द्यावरून अनेक चर्चा सुरु आहेत. यासाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकवेळा टोलेबाजीही झाली आहे. मात्र आता शिक्षक भरती संदर्भात राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. जिथे शिक्षक कमी आहेत तिथे शिक्षकभरती केली जाणार असून अतिरिक्त असतील तिथे त्यांचं समायोजन केलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. आज सभागृहात त्यांनी ही घोषणा केली आहे. याच महिन्याभरात या प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अनेक दिवसांपासून हा शिक्षक भरती रखडली असल्याने अनेकवेळा शिक्षकांकडून आंदोलने झाली. संबंधित अनेक संघटनांनी मोर्चे काढले मात्र तरीही राज्यसरकारला जाग येत नसल्याने विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरलं होतं. मात्र आता या घोषणेमुळे शिक्षकांत पुन्हा एकदा उत्साहाते वातावरण पसरले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply