विधान परिषद निवडणूक निकाल: भाजपाचे चार उमेदवार विजयी, काँग्रेसला धक्का

विधान परिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली असून ते विजयी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात अद्याप चुरस सुरू आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महाविकास आघाडीची एकूण २१ मतं फुटल्याची माहिती समोर येत आहे. कुणाची किती मतं फुटली याबाबत अद्याप माहिती समोर आली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदचे विजयी उमेदवार…
राष्ट्रवादी काँग्रेस -रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते)
शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी- प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (निकाल बाकी)
काँग्रेस -चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप (अद्याप निकाल अस्पष्ट)



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply