वारजेत चार वाहनाचा विचित्र अपघात

वारजे - वारजे पुलावर चार वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुंटूंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान माई मंगेशकर रुग्णालया समोरील पुलावर पुढील गाडीचा अचानक कमी वेग झाल्याने पुढील वँगनार गाडीवर मागील ट्रक धडकला तर पुढे टँकर असल्याने ही गाडी मध्येच चेंबली गेली. या अपघातात वँगनार गाडीचा चक्काचूर झाला. यामध्ये एकाच कुंटूंबातील नवरा- बायको व दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना येथील माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहे. जखमीची नावे अदयाप समजली नाही. या अपघातानंतर येथील महामार्गावर तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर महामार्गावरील वाहने सेवा रस्त्यावर उतरल्याने वारजेतील रस्ते चक्काजाम झाले होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *