लोणावळा : पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोघे अटकेत; लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई; पिस्तुलासह चार काडतुसे जप्त

लोणावळा : बेकायदा पिस्तुल बाळगणाऱ्या एकास लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पवनानगर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. आरोपीला पिस्तुल विक्री करणाऱ्या आणखी एकास अटक करण्यात आली.या प्रकरणी ऋषिकेश अशोक गायकवाड (वय १९, रा पवनानगर, मावळ, जि. पुणे), राजकुमार अनिल माने (वय २३) यांना अटक करण्यात आली.

गायकवाड याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक निलेश माने यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून गायकवाडला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करण्यातआली.गायकवाडची चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपी मानेने त्याला पिस्तुलाची विक्री केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कान्हे फाटा परिसरातून मानेला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक माने, सचिन राऊळ, विजय गाले आदींनी ही कारवाई केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply