यशवंत जाधवांची ‘मातोश्री’स दोन कोटींची भेट; IT च्या हाती लागली महत्वपूर्ण डायरी

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याचं सेनेच्या नेत्यांनी म्हटलं होतं. यानंतर राजकीय वातावरणही तापलं. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. त्यानंतर यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावली आहे. 

आयकर विभागाने सलग चार दिवस जाधवांच्या घरात छापेमारी केली. यावेळी काही महत्वाचे दस्तऐवज देखील हाती लागले. चौकशीदरम्यान जाधवांची डायरी आयकर विभागाच्या हाती लागली. त्यामध्ये जाधव यांनी दोन कोटी रुपये मातोश्रीला दिल्याचा उल्लेख आहे. मातोश्री या म्हणजे कोण, असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्वत:च्या आईला पैसे दिल्याचं सांगितलं. आईला दानधर्म करण्यासाठी पैसे दिल्याचा खुलासा आहे.

यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यांच्यासह विमल अग्रवाल यांच्यावरही कारवाई झाली होती. २०१८ ते २०२२ यशवंत जाधव स्थायी समितीचा कार्यभार पाहात होते. यातील दोन वर्षांच्या काळात त्यांनी १००० सदनिका आणि ३६ इमारतींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. यानंतर तपासात जाधवांची डायरी हाती लागली आहे. यामध्ये ५० लाखांचं घड्याळ मातोश्रीला दिल्याचा उल्लेख देखील आला आहे. जाधवांच्या या दाव्याची पडताळणी सुरू आहे. बेनामी संपत्ती अॅक्ट अंतर्गत ही चौकशी सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply