यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, बेंबळा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले; अनेक गावांत पाणी शिरले

यवतमाळ : दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रभर पाऊस झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. यवतमाळ शहरात आज पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने सकाळच्या सत्रातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली. बेंबळा धरणाचे सहा दरवाजे ५० सेंमीने उघडण्यात आले असून ३०० घसेंमीने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बेंबळा नदी प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने आज सोमवारी सकाळी ८ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत आहे.

राळेगाव तालुक्यातील पूरस्थिती भयंकर झाली आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा, रामगंगा या नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी नागठाणा, गुजती, झाडगाव, पिंपळखुटी, संवगी, बोरी, नागठाणा, भांब, एकबुर्जी, मेंघांपूर, वरुड जहांगीर यासह अनेक गावात शिरले. गेल्या काही वर्षात प्रथमच वर्धा नदीला एवढा मोठा पूर आल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहे.

शेकडो हेक्टरवरील पिके वाहून गेली –

अतिवृष्टी व पुरामुळे शेकडो हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. यवतमाळ शहरात कॉटन मार्केट, तलाव फैल या भागातील घरांमध्ये पाणी शिरले. याशिवाय चाणी, बोरगाव नारकुंड या गावांमध्ये पुलावरुन पाणी वाहत आहे, डोरलीमध्ये शेतबांध फुटून पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर बघता नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामीण भागात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply