मोठी बातमी! राज्यसभा निवडणुकीआधी महाविकास आघाडीला मोठा झटका

मुंबई : राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी केलेला अर्ज फेटाळला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मत देण्यासठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला होता. ईडीने याला विरोध केला होता, यासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हायकोर्टात अपिल करु शकतात. 

राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरुन चांगलेच वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना राज्यसभेसाठी मतदानसाठी परवानगी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. यावर आज कोर्टात सुनावणी झाली.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या मतदान करण्याकरिता मागितलेल्या परवानगीवर ईडीकडून उत्तर दाखल झाले होते. अनिल देशमुख, नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदाना करिता परवानगीला ईडीने (ED)विरोध दर्शवला होता. यावर कर्टात अर्ज दाकल केला होता. कोर्टानेही अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक आता मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मलिक आणि देशमुख राज्यसभा मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात. मुंबई उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावनीची मागणी करू शकतात. मात्र इतक्या कमी वेळात सुनावनी होऊन निकालाची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. महाविकास आघाडीची मत कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.

कायदा काय म्हणतो?

नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभेच्या मतदानाला जाण्यासाठी परवागनी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. या मागणीवर ईडीने एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या ईडीने कायद्याचा हवाला देत मतदानाला बाहेर जाता येणार नसल्याचे म्हटले आहे. ईडीने १९५१ कलम ६२(५) चा हवाला दिला आहे. ' जर एखादा व्यक्ती जेलमध्ये असेलतर त्या व्यक्तीला कोणत्याही निवडणुकीत मतदान करता येणार नाही, या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे. अस यात म्हटेल आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply