मध्य पूर्वेत सध्या मोठा तणाव आहे. अमेरिका आणि इराण आमने-सामने आले आहेत. गेल्या वर्षी इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं होतं, त्यानंतर आता इराणमध्ये सुरू असलेल्या अण्विक प्रकल्पांवरून अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. अमेरिकेनं मध्य पूर्वेत आपल्या युद्ध नौका तैनात केल्या आहेत, तसेच सैन्यबळ देखील वाढवलं आहे. दरम्यान एका वृत्तानुसार तर इराणवर हल्ला नेमका कसा करायचा? याचा एक रिपोर्ट अमेरिकेच्या संरक्षण विभागानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सादर केल्याची माहिती समोर येत आहे, सध्या अमेरिकेत त्यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान मध्य पूर्वेत आधीच इराण व अमेरिकेमुळे तणाव निर्माण झालेला असताना मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे इस्रायलकडून लेबनॉनवर एअरस्ट्राईक करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हा हल्ला एवढा भीषण होता की या हल्ल्यामध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत, तसेच दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये जे लोक मारले गेले त्यातील अनेकजण हे हिज्बुल्लाह या संघटनेशी सबंधित होते.
याबाबत लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाकडून देखील अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलं आहे. या हल्ल्यासाठी इस्त्रायल जबाबदार आहे. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असं लेबनानच्या आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे, दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला ते लोक हिज्बुल्लाहचे सदस्य होते की नव्हते? याबाबत लेबनानकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या हल्ल्यामध्ये अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. एपीच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी इस्रायलकडून लेबनानच्या उत्तर -पूर्वेला असलेल्या रायक गावावर हल्ला करण्यात आला आहे, या हल्ल्यामध्ये जवळपास, हिज्बुल्लाहचे आठ अधिकारी मारले गेल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात लेबनानचं मोठं नुकसान झालं आहे. लेबनॉनकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. आता या एअर स्ट्राईकमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे, लेबनॉन काय भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


