मुंबई - हिम्मत असेल आमदारांनी राजीनामे द्यावेत; संजय राऊतांचे बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षावरून घमासान सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. आता उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्ववभूमीवर संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले की, जे शिसेनेतून बाहेर गेले त्यांची शिवसेना असू शकत नाही ते जनता ठरवेल. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही आमच्या आमदारकीचे राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोरं जा असे ओपन चॅलेंज संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिले आहे. बंडखोर आमदारांनी आपापल्या मतदार संघात निवडून येऊन दाखवावं असंही ते म्हणाले आहेत.

यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आमदारांशी आपला संपर्क झालेला असल्याचा दावा देखील केली. तिथे असाम मध्ये पूर आला आहे आणि तिथे हे लोकं पार्ट्या करत आहे असा आरोप देखील राऊत यांनी लगावला आहे.

काही आमदारांशी आता पाच मिनिटांपूर्वी माझं बोलणं झालं त्यांनी इथे यायची इच्छा व्यक्त केली आहे असा दावा राऊतांनी केला. आमदारांना तिथे जबरदस्तीने डांबून ठेवले आहे किती दिवस ते गुवाहाटीला राहनार असा पुनरुच्चार राऊतांनी केला.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंचे भक्त आहोत असं सांगून शिंदे गटाने पाठीत खंजीर खुपसला आहे. बाळासाहेबांच भक्त असं पाठीत खंजीर खुपसायचं काम करत नाहीत. बंडखोरी नेमकी कुठे होणार हे लवकरच कळेल, असं सूचक वक्तव्य हे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते मुंबईत बोलत होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply