मुंबई – हिंमत असेल तर बांद्र्यात येऊन दाखवा; शिवसैनिकांकडून ‘मातोश्री’समोर बॅनरबाजी

मुंबई - राज्यात हनुमान चालीसा वरून राजकीय वातावरण चागलेच तापले असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. राणा दाम्पत्यांनी मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चाळीसा वाचण्याचा इशारा दिल्यानंतर आता मातोश्री बाहेरील पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. हिंमत असेल तर बांद्र्यात येऊन दाखवा अशा पद्धतीचे शिवसैनिकांकडून बॅनर देखील लावण्यात आले आहे. दरम्यान आज ही मातोश्री बाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा होणार असल्याची माहिती आहे.

त्यामुळे मुंबई पोलिसांनी मध्यरात्री मातोश्रीच्या समोरील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेडिंग केली आहे. मातोश्री बाहेरील एक रस्ता संपूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करूनच सोडले जात आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्री बाहेर जमण्यास सुरुवात झाली आहे.

 

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबई येथील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरला आहे. त्या पार्श्वभूमीवर 'मातोश्री' बाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण केलं नाही तर आपण मातोश्रीसमोर जाऊन पठण करु असं आव्हान आमदार रवी राणा यांनी दिलं होतं. त्यानुसार आमदार रवी राणा आज मुंबईत दाखल झाले असून उद्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार आहेत. त्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मातोश्री बाहेर मोठा फौजफाटा तैनात केला असून बॅरिकेडिंग केलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply