मुंबई : संजय राऊत आज ईडी चौकशीसाठी हजार राहणार; ट्विट करत दिली माहिती

मुंबई - संजय राऊत यांना दोन दिवसांपूर्वी कथित पत्रा चाळ घोटाळाप्रकरणी ईडीनं समन्स  पाठवलं होतं. त्यानंतर संजय राऊत आज ईडी चौकशीसाठी दुपारी १२ वाजता हजार राहणार आहेत. संजय राऊत यांनी ट्वीट करत याबाबद माहिती दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हणाले की, मी आज दुपारी 12 वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझे कर्तव्य आहे. तसेच मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असे आवाहन करतो असं देखील संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीनं 28 जून रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. परंतु, त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र, नियोजित कामामुळे राऊत यांना ईडी (ED) कार्यालयात जाता आलं नाही. त्यानंतर ईडीकडून राऊतांना दुसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलं होत. त्यामध्ये त्यांना १ जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आज संजय राऊत ईडी चौकशीसाठी हजार राहणार आहे.

रिपोर्टनुसार पत्रा चाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे. चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने एचडीआयएलच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला कंत्राट दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन तीन हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती.

गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान आहे. वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे. प्रवीण राऊत यांनी राकेश वाधवानसोबत मिळून पत्राचाळीच्या पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक आणि सुटका झाली. त्यानंतर पुन्हा 2 फेब्रुवारी 2022 रोजी प्रवीण राऊत यांना पुन्हा अटक झाली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply