मुंबई : मुख्यमंत्रिपद शोभतही नाही, जमतही नाही; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका : नारायण राणे

मुंबई : बाळासाहेबांच्या गुणांचे मुल्यमापन कोणी करू नये, ते कर्तृत्ववान होते त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली, ती भोळे म्हणून नव्हे, त्यांच्याकडे माणूसकी होती, कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस याद्वारे त्यांनी वर्चस्व निर्माण केलं. मात्र, साहेबांनी कमावले ते काहींना टिकवता देखील आलं नाही. अशी टीका केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. ते आज महाराष्ट्र दिनानिमित्त सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विकास संस्था, "झेप उद्योगिनी" आणि "वी एमएसएमई" आयोजित 'महाराष्ट्र एमएसएमई एक्सपो २०२२' चे उद्घाटन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

यावेळी बोलताना राणे म्हणाले, महाराष्ट्राने जी प्रगती केली, त्यातील ३४ % वाटा मुंबईचा आहे. राज्यातील नागरिकांनी उद्योगाच्या माध्यमातून प्रगती करावी तसंच बाळासाहेबांच्या गुणांचे मुल्यमापन कोणीही करू नये. बाळासाहेब कर्तृत्ववान होते त्यांनी शिवसेना पुढे नेली, राज्यात सत्ता आणली भोळे म्हणून नाही, त्यांना माणुसकी होती, कडवट हिंदुत्व आणि मराठी माणूस याद्वारे त्यांनी वर्चस्व निर्माण केलं,साहेबांनी कमावले काहींना ते टिकवता आलं नाही. उद्धव ठाकरेंना साहेबांच मूल्यमापन करण्याची नैतिकता नाही. मुख्यमंत्री म्हणून आज महाराष्ट्र दिनी लोकांना देण्यासारखं बोला, गरिबी, निरीक्षितता, दरडोई उत्पन्न यावर बोलावं, जमेल ते करावं, राजकारण जमत नाही, मुख्यमंत्री पदावर शोभतही नाही आणि जमतही नाही. आज महाराष्ट्र १० वर्षे मागे नेण्याचं काम त्यांनी केलं असल्याची गंभीर टीकाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply