मुंबई: मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी होतो, तुम्ही कुठे होता?- देवेंद्र फडणवीस

मुंबई: औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होत असतानाच दुसरीकडे मुंबईमध्ये सोमय्या मैदानावर भाजपची बुस्टर डोस सभा होत आहे. भाजपच्या पोलखोल सभेचा आज समारोप होत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूका लक्षात घेता या सभेला महत्त्व आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीत सभा पार पडत आहे. फडणवीस काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन भाषणाला सुरुवात केली.

काही लोकांना वाटतं हा महाराष्ट्र फक्त त्यांचाच आहे. परंतु हा महाराष्ट्र १८ पगड जातींचा आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही फडणवीसांनी समाचार घेतला. मी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी होतो, तुम्ही कुठे होता. हा देवेंद्र फडणवीस 17 दिवस सेंट्रल जेलमध्ये होता. बाबरी पाडली तेव्हा एकही शिवसेनेचा नेता गेला नाही. बाबरी पाडली तेव्हा आरोप कुणावर झाले तर भाजपच्या नेत्यांवर असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे फडणवीस म्हणाले की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही महाराष्ट्राचा अवमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान. पण मी त्यांना म्हणतो तुम्ही म्हणजे मराठी नाही आणि तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही एक व्याख्या नाही. ज्यावेळी तुम्ही भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करतात आणि तुमचे साथी जेलमध्ये जातात तेव्हा महाराष्ट्र बदनाम होतो. तुम्हाला शरम वाटली पाहिजे. मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले तर हातभर फाटली आणि म्हणतात आम्ही बाबरी पाडली असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

या सभेमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे आदी भाजप नेते उपस्थीत होते. मागच्या दोन वर्षांपासून आघाडी सरकार राज्याला मागे नेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे. या सभेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चार प्रश्न विचारले आहेत. ईद राष्ट्रीय कधीपासून झाला? अक्षय तृतीयेला गावागावात शिवजयंती का साजरी होत आहे? तुम्ही शाहिस्तेखानाची बोटे आपोआप तुटली हे सांगणार आहेत का? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply