मुंबई - महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? सरकार कोसळल्यावर पहिल्याच जाहीर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

मुंबई - महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनासाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव म्हणाले की, माझी तब्येत बिघडली होती, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि अभिषेक करत होते. पण असे काही लोक होते जे अगदी उलट इच्छा करत होते.

अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.

या मुलाखतीत संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला, तो म्हणजे आपलं नक्की काय चुकलं? तर यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये पहिल्याच सांगितलं आहे की चूक ही माझीच आहे आणि ते मी कबूल ही केलं आहे. मी यांना परिवारातला समजून मी यांच्यावरती अंधविश्वास ठेवला यात गुन्हा माझा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असे प्रश्न विचारले असते ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. पण तसं झालं नाही, जनता ही खुश होती, कारण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त केलं होतं. कोरोना काळात संपूर्ण माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केलं, म्हणूनच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं ते जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. मी एकट्याने काय केलं असतं? बरं, मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो. कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply