मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची ११ कोटींची फसवणूक, आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई : मुंबईत एका सेल्स एक्झिक्युटिव्हने खासगी कंपनीला ११.१३ कोटींचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे १,८५० मोबाईल बनावट कागदपत्रांच्या आधारे या आरोपीने परस्पर विकले आहेत. याप्रकरणी पार्कसाइट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीष पुजारी, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. मनीषला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, मनीष एका कंपनीच्या इलेक्ट्रिक वस्तूंची व्रिकी करण्याचे काम करत होता. मनीषने नोव्हेंबर २०२२ पर्यंत विक्रेत्यांना सुमारे ११.१३ कोटींचा रुपयांचा किंमतीचा मोबाईलचा माल विकला. मात्र, त्याचे पैसे कंपनीला दिले नाही. जेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांना विचारले तेव्हा त्यांनी सर्व पैसे दिल्याचं सांगितलं.

कंपनीने पुजारीला १,८५० मोबाईल फोन विक्रीसाठी दिले होते. पण, त्याने ते कंपनीच्या गोदामात जमा केले नाही. त्याऐवजी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची विक्री केली. त्यानंतर कंपनीला फसवणुक झाल्याचं कळताच पुजारीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मयुर पुजारीला मागील आठवड्यात अटक केली आहे. न्यायालयात त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो न्यायालयाने फेटाळला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply