मुंबई : गेटवे ऑफ इंडियाजवळ ७५ फुटांचा तिरंगा फडकणार; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंची संकल्पना

मुंबई: मुंबईत गेवटे ऑफ इंडियाजवळ ७५ फुटांचा तिरंगा फडकणार आहे. आझादीच्या ७५ वर्ष निमित्त तिरंगा फडकवण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी गेटवे ऑफ इंडिया जवळच्या परिसराची सुशोभिकरण करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेटवे ऑफ जवळ तिरंग्याची संकल्पना मांडली, यावर सर्वांचे एकमत झाले.

मुंबईच्या प्रवेशद्वावर तिरंगा फडकणार आहे. ही संकल्पना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती. या संकल्पनेवर सर्वांचे एकमत झाले आहे. हा तिरंगा ७५ फुटांचा उभारला जाणार आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवण्यात येणार आहे. यासाठी आता शुशोभिकरण करण्यात येणार आहे.

Follow us -

मुंबईत दोन ठिकाणी तिरंगा फडकवला जाणार आहे. मुंबईतील शिवाजी महााराज पुतळ्याजवळ आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ तिरंगा फडकवण्यात येणार आहे. देशात सध्या आझादीचे ७५ वर्ष साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात वेगवेगले कार्यक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतही गेवटे ऑफ इंडिया जवळ तिरंगा फडकवला जाणार आहे.

मुंबईत येणारे पर्यटक हे गेटवे ऑफ इंडियाला भेट देत असतात. पर्यटकांची संख्याही जास्त असते. गेटवे ऑफ इंडिया दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गाच्या पूर्वेस अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर स्थित आहे, आणि अरबी समुद्र किनाऱ्यावर आहे. त्यामुळे येथे ७५ फुटी तिरंगा उभा करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply