मुंबई: किरीट सोमय्यांचा मुलगा नील याला हायकोर्टाचा मोठा दिलासा

मुंबई: 'सेव्ह आयएनएस विक्रांत' मदतनिधी घोटाळा प्रकरणात अडचणीत सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील याला मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. तसेच पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला हजर राहून तपासात सहकार्य करण्याचे आदेश कोर्टाने नील सोमय्याला दिले आहेत.

सेव्ह आयएनएस विक्रांत मदतनिधी प्रकरणात अपहार झाल्याचा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर आरोप आहे. यामुळे सोमय्या पिता-पुत्र अडचणीत सापडले आहेत. किरीट सोमय्या यांच्यानंतर आता मुंबई हायकोर्टानं त्यांचा मुलगा नील यालाही दिलासा दिला आहे. नील सोमय्याला मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम दिलासा दिला आहे. अटक झाली तर, नीलची ५० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, २५ ते २८ एप्रिल या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नीलला तपास अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *