मुंबई :  किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, मुलाचा फैसला उद्या

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी करण्यात येणार आहे. आज सकाळी या सर्व प्रकरणावर आज सकाळी दोन्ही पक्षांकडून युक्तीवाद पूर्ण झाला होता. मात्र, न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला होता. आता त्यावरील निकाल देण्यात आला असून, न्यायालयाने सोमय्यांचा दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्यांना अटक होणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे. (INS Vikrant Case Updates)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणीकिरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या  यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल म्हणजेच, आज सुनावणी पार पडली. पण न्यायालयानं निर्णय संध्याकाळपर्यंत राखून ठेवला होता. त्यात आता न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून, नील सोमय्या यांच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता किरीट सोमय्या उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply