मुंबई: एक दुजे के लिए... महाराष्ट्रातल्या या सिनेमाचा राजकीय अंत लवकरच होईल: संजय राऊत

मुंबई: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत. नवं सरकार हे बेकायदेशीर आहे असं शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येतंय. दररोज शिंदे गटातील आमदार आणि शिवसनेना नेते यांच्यात शाब्दिक चकमकी होताना दिसतायत. अशात शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत हे शिंदे सरकार आणि भाजपवर  टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आजही पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केली आहे. हे सरकार बेकायदेशीर असून या एक दुजे के लिए चित्रपटाचा लवकरच राजकीय अंत होईल असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यंमंत्री एकनाथ शिंदेंवर आणि उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. सोबत त्यांनी संसदेत बंदी आणलेल्या शब्दांबातही भाष्य करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, ज्या पद्धतीने हे निर्णय सुरू आहेत एक प्रकारे प्रखर बोलण्यावर बंदी आणली आहे. अश्या प्रकारे बंदी आणणं लोकशाहीचा गळा घोटनं आहे. लोकशाहीची भीती एखाद्या सरकारला वाटत असेल तर लोकशाहीला भीती आहे. या देशात लोकशाही आहे का हा प्रश्न जगाला पडेल असा टोला राऊतांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

शिवसेनेशी बंडखोरी करुन शिंदे गटात गेलेल्या आमदारांबाबत राऊत म्हणाले की, बेमान शेवटपर्यंत सांगतो की, मी बेईमान नाही. तुम्ही शिवसेना शिवसेना का करता? बंडखोर नेत्याला असं बोलावं लागत? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले की, गेल्या 56 वर्षात ज्यांनी शिवसेना सोडली ते हद्दपार झाले. मुळात हे सरकारच बेकायदेशीर आहे. एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्रि असा हा सिनेमा आहे, या सिनेमाचा राजकीय अंत होईल असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply