मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान कुणाला? वाचा संपूर्ण यादी

मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तब्बल 39 दिवसांनंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला आहे. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटातील मिळून एकूण 18 जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात नेमकं कुणाला याची उत्सुकता सर्वांनाच होती. आता पहिल्या टप्प्यात शपथ घेणाऱ्या आमदारांची नावे समोर आली आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता काही तास उरले आहे. इच्छुक आमदार हे मुंबईत दाखल झाले आहे. सकाळी ११ वाजता या भावी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंगळवारपर्यंत ९ जण शपथ घेणार अशी शक्यता होती. पण रात्रभरात या हालचालींना वेग आला.

शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची नावे वाढवणे सुरू असल्याची माहिती आहे. रात्री पर्यंत ८ भाजपा आणि ८ शिंदे शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे फायनल झाली होती. पण रात्री उशिरा शिंदे गटातील एक आणि भाजपमधील आणखी एका आमदाराचं नाव वाढवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदे गटात कुणाला मिळणार मंत्रिपद

गुलाबराव पाटील

संदिपान भूमरे

दीपक केसरकर

तानाजी सावंत

शंभुराजे देसाई

दादा भुसे

उदय सामंत

संजय राठोड

अब्दुल सत्तार

भाजपकडून हे नेते घेणार शपथ

चंद्रकांत पाटील

गिरीश महाजन

सुधीर मुनगंटीवार

रवींद्र चव्हाण

राधाकृष्ण विखे पाटील

विजयकुमार गावित

सुरेश खाडे

अतुल सावे

मंगल प्रभात लोढा

टीईटी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले अब्दुल सत्तार सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तसंच, पूजा चव्हाण प्रकरणामुळे मंत्रिपद गमावलेले संजय राठोड यांचे नाव सुद्धा मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. संजय राठोड सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांचाही एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply