
मुंबई : शिंदे सरकारने ‘मेट्रो ३’ची कारशेड कांजूरऐवजी आरे वसाहत परिसरात उभारण्याची घोषणा केल्यानंतर वादाची ठिकणी पडली असतानाच आज (सोमवार) सकाळी आरेतील रस्ते २४ तासांसाठी बंद करण्यात आले. त्यानंतर तत्काळ या परिसरातील रस्त्यांवरील झाडांची छाटणी सुरू करण्यात आली. ‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) दोन डबे लवकरच मुंबईत दाखल होत असून ते मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यात येणार आहेत. त्यासाठी ही छाटणी करण्यात येत असल्याचे समजते. मात्र वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने ‘मेट्रो ३’ची कारशेड आरेमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आरेतील कामावरील बंदीही उठविण्यात आली आहे. यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) ‘मेट्रो ३’च्या कामाला गती दिली आहे. तसेच आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथील कारखान्यातून मेट्रो गाडी मुंबईत आणण्यात येत आहे. गाडीचे आठपैकी दोन डबे सहा-सात दिवसांपूर्वी श्रीसिटी येथून रस्ते मार्गे रवाना झाले आहेत. येत्या आठ-दहा दिवसांमध्ये हे डबे मुंबईत दाखल होणार असून ते मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यात येणार आहेत. मोठाल्या ट्रेलरवरून हे डबे आणण्यात येत आहेत. रस्त्यांवरील झाडांचा डब्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचे समजते.
मरोळ आणि गोरेगाव येथून आरे परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक सोमवारी सकाळी बंद करण्यात आली. आरे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले. हे रस्ते २४ तास वाहतुकीसाठी बंद करून झाडांची छाटणी करण्यास सुरुवात करण्यात आली. याविषयी माहिती देण्यास एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. पण या कामामुळे ‘आरे वाचवा’ चळवळीतील आंदोलक कमालीचे संतप्त झाले आहेत.
“वृक्ष छाटणीच्या नावाखाली एमएमआरसी कारशेडचे काम सुरू करेल, अशी आम्हाला भीती आहे. आरेमधील कारशेडच्या जागेतील झाडांची कत्तल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. येथे आज सकाळपासून सुरू असलेल्या कामाविषयी चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींना हुसकावून लावण्यात येत आहे. काही पर्यावरणप्रेमींना पोलीस ताब्यात घेत आहेत.” अशी माहिती पर्यावरण प्रेमी संजीव वल्सन यांनी दिली.
शहर
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
महाराष्ट्र
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या























Subscribe to my channel


