मुंबई : अनिल देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, सीबीआयची विनंती हायकोर्टाकडून मान्य

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण त्यांचा तुरुंगातील मुक्काम आता पुन्हा एकदा वाढला आहे. त्यांच्या जामीनाला आता येत्या 27 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांना तुर्तास तरी दिलासा मिळणार नाही.

अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला रोजी मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने हायकोर्टात धाव घेतल दहा दिवसांची स्थगितीची विनंती केली होती. ती न्यायालयाने मान्य केली. ती मुदत उद्या संपत असताना सीबीआयने पुन्हा एकदा 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे.

CBIच्या विनंती नुसार अंमलबजावणीसाठी 10 दिवस स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यासाठी CBI नं परत वाढीव मुदत मागितली आहे. मात्र इथून पुढे कोणतीही विनंती मान्य करणार नसल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *