नात्याला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी शाळेत प्रिन्सिपल पदावर कार्यरत असणाऱ्या महिलेने आपल्या सासऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. तिने पोलीसात धाव घेतली आहे. महिलेने पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या तक्रारीनुसार मागच्या सहा वर्षांपासून तिचं वारंवार लैंगिक शोषण सुरु होतं. पीडित महिला 2007 पासून शिक्षण क्षेत्रात सक्रीय आहे. सासऱ्याने केवळ लैंगिक शोषणच केलं नाही, तर शारीरिक दृष्ट्या तिचा छळही केला. पोलिसांनी एफआयआर नोंदवून प्रकरणाचा पुढील तपास सुरु केलाय. उत्तर बंगळुरुमधील हे प्रकरण आहे.
लग्नानंतर सुरुवातीची काही वर्ष कुठलीही अडचण नव्हती. पण आरोपीने वर्ष 2020 पासून तिच्यासोबत वाईट व्यवहार सुरु केला. त्यावेळी कुटुंब एकच अपार्टमेन्ट कॉम्पलेक्समध्ये रहायचं. महिलेच म्हणणं आहे की, ज्यावेळी ती घरात एकटी असायची. त्यावेळी आरोपी घरात घुसून तिच्याशी चुकीच वर्तन करायचा असा पीडित महिलेचा आरोप आहे.
हिम्मत करुन सर्वकाही पतीला सांगितलं
पीडित महिलेने FIR मध्ये म्हटलय की, या प्रकाराबद्दल कुठे वाच्यता केली, तर तुझ्या मुलांचं वाईट करेन अशी आरोपी सासऱ्याकडून वारंवार धमकी दिली जायची. भिती पोटी महिला शांत राहिली. परिस्थिती बदलेल अशी तिला अपेक्षा होती. पण शोषण सुरुच राहिलं. अखेर तिने एकदिवशी हिम्मत करुन सर्वकाही पतीला सांगितलं. कुटुंबातील मोठ्यांनी यात हस्तक्षेप केला. आरोपीला इशारा दिला. त्यानंतर काही काळासाठी आरोपीचं असं वागणं बंद झालं. तक्रारदार महिलेने सांगितलं की, आरोपीने नंतर पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली.
अपार्टमेन्टच्या लिफ्टजवळ पुन्हा तिला..
आरोपी सासऱ्याने अनेकदा स्वत:च्या हाताने लिहिलेली पत्र तिला दिली. यात खूप घाणेरडा मजकूर असायचा. ते पत्र वाचल्यानंतर तो परत घ्यायचा.आरोपीचं असं वागणं 2020 ते डिसेंबर 2025 पर्यंत सुरुच होतं असा महिलेने आरोप केलाय. 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता महिला बाहेर निघत होती. त्यावेळी आरोपीने अपार्टमेन्टच्या लिफ्टजवळ पुन्हा तिला शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर आरोपी पोटात बुक्का मारुन पळून गेला, असा महिलेचा आरोप आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये सहभागी असलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे. राज्य महिला आयोगाने सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


