औरंगाबाद : उन्हाळ्यामुळे राज्यात विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये मंगळवारी (ता. १५) महावितरणने मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात आजवरच्या सर्वाधिक मागणीनुसार वीजपुरवठ्याचा महाविक्रम नोंदविला आहे.
राज्यातील मागणीप्रमाणे ‘महावितरण’ने तब्बल २३ हजार ६०५ मेगावॉट विजेचा सुरळीत व अखंडित वीजपुरवठा केला. दरम्यान मुंबईसह राज्यात या दिवशी २७ हजार २१२ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे गेल्या महिन्याभरात विजेच्या उच्चांकी मागणीने इतिहास घडवला आहे. यापूर्वी १९ फेब्रुवारीला महावितरणकडून सर्वाधिक उच्चांकी २३ हजार २८६ मेगावॉट विजेचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापूर्वी ८ फेब्रुवारीला २३ हजार ७५ तर १२ फेब्रुवारीला २३ हजार १६३ मेगावॉटचा मागणीप्रमाणे विक्रमी वीजपुरवठा करण्यात आला.
महावितरणने मंगळवारी (ता. १५) महानिर्मितीकडून ६ हजार ५७८ मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण ४ हजार ९११ मेगावॉट तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्पो या खासगी प्रकल्पांमधून ४ हजार ७२२ मेगावॉट वीज उपलब्ध केली आहे. त्याचप्रमाणे नवीकरणीय ऊर्जेच्या स्रोतांतून सौर ऊर्जा २५८५ मेगावॉट, पवन ऊर्जा ६०३ मेगावॉट तसेच सह वीजनिर्मिती प्रकल्पांतून १५०० मेगावॉट अशी एकूण ४ हजार ६८८ मेगावॉट वीज उपलब्ध झाली. उर्वरित विजेची मागणी ही कोयना व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १ हजार ६१२ मेगावॉट वीजनिर्मिती करून तसेच मुक्त ग्राहक व रेल्वेच्या वीजनिर्मिती स्रोत्रातून ७२२ मेगावॉट आणि पॉवर एक्स्चेंजमधून ३७२ मेगावॉट विजेची खरेदी करून पूर्ण केली आहे.
विजेची मागणी २४ हजार मेगावॅटवर जाणार
सुरळीत पुरवठ्यामुळे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक केले आहे. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात विविध स्त्रोतांमधून विजेची विक्रमी मागणी पूर्ण करण्यात महावितरणने यश मिळविले. सद्य:स्थितीत विजेची मागणी २३ हजार ते २३ हजार ५०० मेगावॅट दरम्यान आहे. मात्र, तापमानात वाढ होत असल्याने येत्या काही दिवसांमध्ये ही मागणी २४ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता आहे.हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




