महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला; सोलापूर जिल्ह्यातील 18 गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक

Maharashtra - Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद राज्यात पेटलेला असताना याबाबत सोलापूरातून मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 18 गावं कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

या १८ गावांमधील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गावात रस्ते, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबत उद्या, ३० नोव्हेंबरला या १८ गावातील गावकरी हे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देत सर्व गावचे प्रतिनिधी निवेदन देणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव, कोर्सगांव, मुंडेवाडी, कुमठे, केगांव बु., केगांव खुर्द, चिंचोली नजीक, सुलेरजवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ इत्यादी गावं हे कर्नाटकात जाण्यास उत्सुक आहेत.

दरम्यान जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत बोम्मईंनी हा दावा केला आहे.

'कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे' असं बोम्मई म्हणालेत. यामुळे राज्यातील विरोधकांनी सत्ताधारी असलेल्या भाजपवर हल्लाबोल केला आहे. एकूणच यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी पेटला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply