महापौरपदाच्या निवडणुकीनंतर दिल्ली महापालिकेत पुन्हा राडा; स्थायी समितीच्या निवडीवरून आप-भाजपा आमने-सामने

बुधवारी दिल्ली महापालिकेत महापौरपदासाठी निवडणूक पार पडल्यानंतर स्थायी समितीच्या सदस्यांची निवड होणार होती. मात्र, या निवडीवरून मोठा गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी आम आदमी पक्ष आणि भाजपाच्या नगरसेवकांनी ऐकमेकांना धक्काबुक्कीही केली. तसेच काही नगरसेवकांनी ऐकमेकांवर पाण्याच्या बाटल्याही फेकल्या. त्यामुळे काल रात्री उशीरा सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

स्थायी समितीतील सदस्यांच्या निवडीसाठी गुप्तमतदान पार पडणार होते. मात्र, यावेळी काही नगरसेवकांनी आपल्या मोबाईद्वारे मतपत्रिकेचा फोटो काढल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला. यावरून आणि आपचे नगरसेवक ऐकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही पक्षांतील नगरसेवकांनी ऐकमेकांवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. रात्री उशीरापर्यंत हा गोंधळ सुरू होता.

यासंदर्भात बोलताना आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, भाजपाला स्थायी समितीची निवडणूक स्थगित करायची आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक गदारोळ करत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक घेऊ. तर, ‘आप’ला क्राँस वोटींगची भीती असल्यानेच गदारोळ केला जात असल्याचा आरोप भाजपा नेते शेहजाद पूनावाला यांनी केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply