महापालिकेवर प्रशासक लागू; कार्यकर्त्यांची गडबड शांत, कार्यालये बंद

पुणे : पुणे महापालिकेवर आजपासून प्रशासक लागू झाल्याने एरवी नगरसेवकांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची गडबड शांत झाल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळाले. राजकीय पक्षांची आणि पदाधिकाऱ्यांची कार्यालये देखील बंद झाली असून, तेथील कर्मचारी साहित्याची आवराआवरी करत आहेत. पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची मुदत १४ मार्च रोजी संपली. त्यामुळे हे सर्व माननीय आजपासून माजी नगरसेवक झाले आहेत. त्याचसोबत महापालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये, पदाधिकाऱ्यांची कार्यालये प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर कायम वर्दळ असायची. महापौर, सभागृहनेते, स्थायी समिती अध्यक्षांसह विरोधीपक्षनेत्यांना भेटण्यासाठी नागरिक येत, कार्यकर्ते, ठेकेदार यांचीही कार्यालयाबाहेर वर्दळ असायची. पण हे सर्व कार्यालय आजपासून बंद झाली. तसेच या कार्यालयांमधील चहापाण्याची व्यवस्थाही बंद झाली. त्यामुळे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर गर्दी नव्हती. जुन्या इमारतीमध्ये प्रशासकीय कामकाज रोजच्याप्रमाणे सुरू झाले. दुपारनंतर अधिकाऱ्यांना भेटून कामे करून घेण्यासाठी गर्दी केली जात होती. पण आज मोजकेच नगरसेवक पालिकेत दिलसे. पाणी पुरवठा, आरोग्य विभाग, बांधकाम विभागात जाऊन स्वतःची तसेच प्रभागातील नागरिकांची कामे मार्गी लावून घेण्याचा प्रयत्न सुरू होता.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply