मराठी भाषा गौरव दिन विशेष:भुसावळच्या 660 मेगावॅट केंद्रात क्लिन्कर कोसळला, नटसम्राट सांगताहेत वीज तुटवड्याबाबत

मराठी भाषेला अनेक दिग्गज मराठी लेखकांनी वैभव प्राप्त करून दिले. त्यांनी लेखणीतून निर्माण केलेल्या काही विलक्षण व्यक्तिरेखांचे गारूड आजही मराठी मनावर आहे. या व्यक्तिरेखांनी आजच्या ताज्या बातम्यांचे रिपोर्टिंग कसे केले असते, अशी मांडणी मराठी भाषा गौरव

.

ज्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो, त्या शिरवाडकरांनी नटसम्राटमध्ये उभे केलेले अप्पासाहेब बेलवलकर आर्त हाक देतायत ‘कुणी वीज देतंय का वीज.’

लोकहो, मी जसा एकेकाळी कुणी घर देतंय का घर, अशी हृदयाला चरे पाडणारी याचना केली होती, तशीच परिस्थिती महाराष्ट्रावर 6 ते 8 दिवसांसाठी येऊ शकते. भुसावळच्या दीपनगर येथे 660 मेगावॅट वीज उत्पादन केंद्रात क्लिन्कर कोसळला. बॉटम ॲश हॉपरमधील पाण्यात पडलेल्या 1200 सेंटिग्रेड तापमान असलेला क्लिन्कर कोसळल्याने वाफेच्या प्रेशरने पाणी, राख बाहेर फेकले गेले. सुदैवाने या परिसरात कर्मचारी नसल्याने जीवितहानी टळली.

मात्र, या घटनेमुळे दीपनगर केंद्रातून रोज सुरू असलेली विजेची निर्मिती उन्हाळ्याचे चटके वाढत असतानाच थांबली आहे. परिणामी राज्यात थेट 660 मेगावॅट विजेचा तुटवडा पडणार आहे. तो भरून काढण्यासाठी महाराष्ट्राला इतर राज्य किंवा केंद्र सरकारकडे कुणी वीज देतंय का वीज, अशी याचना करावी लागणार आहे.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

1 thought on “मराठी भाषा गौरव दिन विशेष:भुसावळच्या 660 मेगावॅट केंद्रात क्लिन्कर कोसळला, नटसम्राट सांगताहेत वीज तुटवड्याबाबत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *