मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांविरोधात 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल

मुंबई : दाऊद इब्राहिमशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.

ईडीच्या वकिलांनी सांगितले की, कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या प्रकरणांसाठी विशेष न्यायालय कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आरोपपत्राची दखल घेईल असे वकिलांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक यांचे कुटुंबीय तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीने म्हटले असून, ईडीने विशेष न्यायालयाला सांगितले की, नवाब मलिकांची मुले अमीर मलिक आणि फराज मलिक अनेक समन्स बजावल्यानंतरही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. मलिकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्र एकूण 5 हजार पानी असून, 9 खंड आणि 52 परिशिष्ट आरोपपत्रात समाविष्ट करण्यात



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply