मद्यप्रेमींची थर्टी फर्स्ट पार्टी होणार जोरात! 24,25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत दारुची दुकानं राहणार सुरू

मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्री करण्यासाठी मोठी सूट दिली आहे. यानुसार २४, २५ आणि ३१ डिसेंबरला दारुची दुकानं पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना या २४,२५ आणि ३१ डिसेंबरला पहाटे ५ वाजेपर्यंत मद्य विकत घेता येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाच्या या निर्णयामुळे मद्यप्रेमींची थर्टी फर्स्टची पार्टी जोरात होणार हे नक्की.

नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेकजण आदल्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबरला मद्याचे सेवन करतात. त्यामुळे या काळात मद्याची मागणी प्रचंड असते. तसेच जास्त मद्यविक्रीमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाला आर्थिक फायदा होऊन राज्याच्या तिजोरीतही भर पडते. त्यामुळे यंदा राज्य सरकाने २४,२५ आणि ३१ डिसेंबरला दारू विक्रेत्यांनी पहाटे ५ वाजेपर्यंत दारु विकण्यासाठी परवानगी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply