भिवंडी : दहा तासांमध्येच 'निष्ठा' बदलली, आदित्य ठाकरेंच्या यात्रेनंतर भिवंडीचे नगरसेवक शिंदे गटात!

भिवंडी : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज सकाळीच भिवंडीत निष्ठा यात्रा घेत सभेत भाषण केलं होतं. त्यांच्या निष्ठा यात्रेला 10 तास होत नाही तोच भिवंडी महापालिकेतील 33 नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी भिवंडी महापालिकेतील शिवसेनेचे 7 नगरसेवक तर काँग्रेसचे 26 नगरसेवक शिंदेगटात सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबतच काँग्रेसलाही दणका दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला खिंडार पडलं आहे. आधी शिवसेनेचे 40 आमदार शिंदेंसोबत गेले, त्यामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार पडलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर शिवसेनेच्या 19 पैकी 12 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. आमदार-खासदारांनंतर स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवकही शिंदेंकडे जात आहेत.

शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर गळती लागल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना भवनवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत, तर आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा काढत आहे. आदित्य ठाकरेंची ही निष्ठा यात्रा एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply