भारत सरकारची डिजिटल स्ट्राइक : पुन्हा एकदा केंद्राकडून 22 यूट्यूब चॅनल ब्लॉक

नवी दिल्ली : देशाची सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सरकारी आदेशांबाबत खोटी माहिती पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनल्सवर केंद्राकडून कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून, केंद्राकडून खोट्या बातम्या पसवणाऱ्या 22 यूट्यूब चॅनेलवर (You Tube Channels) कारावाई करत त्यांना ब्लॉक करण्यात आले आहे. यातील 4 चॅनेल पाकिस्तानातील आहेत. यासोबतच केंद्राकडून 3 ट्विटर अकाऊंट, एक फेसबुक अकाऊंट आणि एक न्यूज वेबसाईटही ब्लॉक करण्यात आली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे (Ministry of Information and Broadcasting) ही कारवाई करण्यात आली आहे. या सर्व वाहिन्यांच्या वतीने लोकांमध्ये खोटी माहिती पसरवली जात होती. 

भारताविरोधात (India) षड्यंत्र रचणे, खोटी माहिती पसरवणे आणि समाजात फूट पाडणारे असे कोणतेही खाते ब्लॉक करण्यासाठी भविष्यातदेखील कारवाई केली जाईल, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आणि या वर्षी जानेवारी महिन्यातही मंत्रालयाने अशी कारवाई केली होती. 

भारतविरोधी प्रचार आणि खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल 20 यूट्यूब चॅनेल आणि दोन वेबसाइट्स गेल्या महिन्यात ब्लॉक केल्यानंतर देशाविरेधात कट रचणाऱ्यांवर सरकार अशी कारवाई सुरूच ठेवेल, असा इशारा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिला होता. ब्लॉक केलेल्या YouTube चॅनेलमध्ये एओपी न्यूज, एआरपी न्यूज, एलडीसी न्यूज, सरकारी बाबू, एसएस जोन हिंदी, ऑनलाइन खबर, डीपी समाचार, पीकेबी न्यूज, बोराना समाचार, डिजी गुरुकुल, दिनभरकी खबरें इत्यादी चॅनल्सचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply