भारताची सायबर सुरक्षा धोक्यात, लष्करी अधिकारी जाळ्यात?

लष्करी अधिकाऱ्यांकडून सायबर सुरक्षेचा भंग झाल्याची धक्कादायक गोष्ट गुप्तचर यंत्रणांच्या तपासातून समोर आली आहे. शेजारी राष्ट्रांच्या हेरगिरीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून हा सुरक्षेचा भंग झाला असल्याचं समोर येत आहे.

लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा यांनी मिळून काही लष्करी अधिकाऱ्यांकडून सायबर सुरक्षेचा भंग झाल्याचं उघडकीस आणलं आहे. हे प्रकरण शेजारी राष्ट्रांच्या हेरगिरीच्या प्रयत्नांचा भाग असू शकतो, अशी शक्यता आहे. हा सुरक्षाभंग काही व्हॉटसप गृप्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधित तपास सुरू आहे. अशा प्रकारची विशेषतः सुरक्षेशी संबंधित गैरकृत्यांची अत्यंत कठोरपणे तपासणी केली जाते, कारण ही प्रकरणे ऑफिशियल सिक्रेट अॅक्टशी संबंधित असतात. संबंधित चौकशीदरम्यान जे अधिकारी दोषी सिद्ध होतील त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. हा विषय संवेदनशील असल्याने तसंच याप्रकरणी तपास सुरू असल्याने याबद्दल कोणत्याही प्रकारचं भाष्य करणं आपण टाळत असल्याचं लष्करी सूत्रांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.

गेल्या काही काळात पाकिस्तान आणि चीनच्या गुप्तचर यंत्रणा लष्करी अधिकाऱ्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या माध्यमातून त्यांच्याकडून लष्कर आणि त्यांच्या कृतींबद्दलची गुप्त व संवेदनशील माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे बहुतांश प्रयत्न अयशस्वी होत असले तरी काही लष्करी अधिकारी त्यांच्या जाळ्यात अडकल्याने त्यांना माहिती काढून घेण्यात यश येत आहे. अधिकाऱ्यांना वेळोवेळी सोशल मीडियासंदर्भातील लष्करी नियमावलीचं कठोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply