बीड : दुर्दैवी! कर्जबाजारीपणाला कंटाळून 55 वर्षीय शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

बीड  : राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. आज बीडमध्ये आणखी एका शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील या शेतकरी आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यात एका 55 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी अन कर्जबाजारी पणाला कंटाळून, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

ही धक्कादायक घटना बीडच्या कळसंबर गावात रात्री 11 वाजता उघडकीस आली आहे. सुग्रीव वाघमारे वय 55 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मयत सुग्रीव वाघमारे यांनी, गेल्या काही वर्षांपासून नापिकीमुळे झालेले नुकसान आणि कर्जाचा झालेला डोंगर, या बाबीला कंटाळुन स्वतः च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. 

दरम्यान सुग्रीव वाघमारे यांच्याकडे नेकनुर येथील एस.बी.आय बँकेचे दिड लाख रुपये कर्ज आहे. तर इतर खाजगी व्यवहार देखील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply