बीड कार अपघात टेम्पोने कारला चिरडलं; एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार

बीड: बीडच्या पाटोदा - मांजरसूंबा रोडवरील पाटोद्याजवळ असणाऱ्या बामदळे वस्ती येथे, स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कुटे नामक एकाच कुटुंबातील 6 जण जागीच ठार झाले आहेत. घटनास्थळी पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले असून अपघातातील व्यक्तींना बाहेर काढले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कुटे कुटुंबिय हे पुणे येथून आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे जात होते. मात्र, पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सात वाजेच्या सुमारार आयशर टेम्पो आणि त्यांच्या स्विफ्ट कारचा अपघात झाला. अपघातात टेम्पो थेट कारच्यावर चढल्याने कार पुर्णपणे दाबली गेली. हा अपघात एवढा भीषण होता, की आयशर टेम्पोच्या खाली स्विफ्ट कार घुसल्याने आणि कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामुळे कारमध्ये बसलेल्या कुटे कुंटुंबियातील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

टेम्पोखाली अडकलेली स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. गाडीमधील व्यक्तींचा अक्षरशः शरीराचा चंदामेंदा झालेला होता. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस हजर झाले होते, या सर्वांनी मिळून गाडीबाहेर मृतदेह काढण्यास मदत केली. या अपघाताचा पुढील तपास केला जात आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply