बालिश पोरगी 46 वर्षाचा म्हातारा आवडतो… मोठा गोंधळ, जाहिरपणे प्रेम व्यक्त करणे पडले महागात, थेट…

बिग बॉस मराठी सीजन 6 चांगलेच रंगात आलंय. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख या सीजनला होस्ट करत आहे. भाऊच्या धक्क्यात चांगली धमाल होते. रितेश देशमुख याचा कधीही न बघितलेला खतरनाक अवतारही अनेकदा भाऊच्या धक्क्यात बघायला मिळतो. रितेश एका मुद्द्यामध्ये रुचिता जामदार हिला बोलत असताना तिने चेहऱ्यावरील रिअॅक्शन बदलली हे पाहून रितेश देशमुख याचा पारा इतका जास्त चढला की, त्याने थेट रुचिता जामदार हिला सुनावले आणि ती जोपर्यंत भाऊच्या धक्क्यातून उठून जाणार नाही, तोपर्यंत मी बोलणार नसल्याने त्याने म्हटले. राखी सावंत आणि रुचिता जामदार यांच्यात देखील जोरदार वाद झाला. रुचिता जामदार ही बिग बॉस मराठी सीजन 6 मधील वादग्रस्त स्पर्धेक बनत चालली आहे. त्यामध्येच आता बिग बॉसच्या घरात रुचिता जामदार हिचा लव्ह अॅंगलही पुढे आला ज्याने थेट खळबळ उडाली.

विशाल कोटीयन आणि रुचिता जामदार यांनी प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र, विशाल कोटीयन याच्यापेक्षा रुचिता जामदार वयाने अत्यंत छोटी आहे. दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर आहे. रुचिता जामदार हिच्या कबुलीनंतर विशाल कोटीयन याने थेट आपल्याला रुचिता आवडते म्हटले. आता तर काय दोघांनीही एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली आहे.

रुचिता जामदार आणि विशाल कोटीयन यांच्यातील या गोष्टी लोकांना अजिबातच आवडताना दिसत नाहीत. थेट सोशल मीडियावर खडेबोल सुनावले जात आहेत. एक व्हिडीओ रुचिता जामदार आणि विशाल कोटीयन यांचा व्हायरल होत आहे. बालिश पोरगी जिला 46 वर्षांचा म्हातारा आवडतो, असे त्या व्हिडीओवर म्हणण्यात आले. काहींचे म्हणणे आहे की, हे फक्त बिग बॉसच्या घरातील प्रेम आहे.

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने म्हटले की, हिला बाहेर काढा बिग बॉस महाराष्ट्राची लाज घालवती हिने. रुचिता जामदार हिने अनु हिच्यासोबत बोलताना विशाल याच्याबद्दल मनात काय भावना आहेत, यावर भाष्य केले होते. मात्र, लोकांना रुचिता जामदार आणि विशाल यांच्यातील हा लव्ह अॅंगल अजिबात आवडत नाही. उलट तिला घराबाहेर काढण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *