बारामती तालुक्यातील पन्नासहून अधिक गावांना फोर्स लोडशेडींगचा फटका

बारामती - उष्णतेच्या लाटेमुळे वीजेची मागणी  व पुरवठा  यात अचानक तफावत पडल्याने बारामती तालुक्यातील  जवळपास 50 गावांना तब्बल बारा तासांच्या भारनियमनाचा फटका बसला.

ज्या गावातील वीजपुरवठा सिंगल फेजिंग आहे अशा गावांना विशेषतः या आकस्मिक भारनियमनाचा फटका बसला. संपूर्ण रात्र अंधार व उकाड्यात व्यतित करावी लागल्याने अनेकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

या बाबत महावितरणच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता उच्चस्तरावरुन फोर्स लोडशेडींग करण्याच्या अचानक सूचना आल्याने सिंगल फेज फीडरवर लोडशेंडीग केले गेले अशी माहिती त्यांनी दिली.

बारामती तालुक्यात जवळपास 36 सिंगलफेजचे तर 9 गावठाण स्वरुपाचे फीडर आहेत. कृषीचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश आल्याने सिंगलफेजिंग फीडरवरील गावे अंधारात गेली.

दरम्यान या पुढील काळातही मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण झाली तर उच्चस्तरीय सूचनांनुसार अचानक भारनियमन कधीही होऊ शकते, असेही अधिका-यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात स्थानिक कार्यालयाच्या हातात फारसे काही नाही, वरिष्ठ पातळीवरुन राज्यस्तरावरील मागणी व पुरवठ्याच्या गणितात समतोल साधण्यासाठी ग्रुपनिहाय भारनियमन केले जाते, असेही स्पष्ट करण्यात आले.

एकीकडे उन्हाची तीव्रता कमालीची वाढलेली असताना रात्रभर उकाड्यात राहावे लागल्याने लोकांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे या लोडशेडींगचा पिकांनाही काही अंशी फटका बसला बारा तास भारनियमन झाल्याने पिकांना पाणीही देणे शेतक-यांना शक्य झाले नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply