‘बच्चन पांडे’ आपटला, ‘काश्मीर फाईल्सनं’ उडवला धुव्वा

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स प्रदर्शित  झाला.आणि त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली. 11 मार्चला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काश्मीर फाईल्सचं कौतूक ऐकून अनेकांनी काश्मीर फाईल्स पाहिल्याची उदाहरणं आहेत. तसेच या चित्रपटाचं प्रमोशनही मोठ्या प्रमाणात करण्यात आलं. आता तर त्याला राजकीय आणि धार्मिक रंग चढल्याचे दिसून आले आहे. राजकीय पक्षांमध्ये काश्मीर फाईल्सवरुन वादाला सुरुवात झाली आहे. भाजप प्रणित राज्यांमध्ये तर हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अशावेळी जे चित्रपट गेल्या दोन आठवड्यात प्रदर्शित झाले त्याला जेमतेम प्रतिसाद मिळाला आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. मात्र त्याचा द काश्मीर फाईल्ससमोर निभाव लागला नाही. या चित्रपटानं मान टाकली आहे. दिवसेंदिवस काश्मीर फाईल्सला मिळणारा प्रतिसाद पाहता बच्चन पांडेला मोठ्या प्रमाणात स्क्रिन मिळून देखील प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे हैद्राबाद, ओरिसा याठिकाणी थिएटरमध्ये बच्चन पांडे आणि काश्मीर फाईल्स यावरुन मोठा वाद झाला होता. त्यात काही व्यक्तींनी तर प्रेक्षकांना बच्चन पांडे हा चित्रपट न पाहता काश्मीर फाईल्स पाहण्यास प्राधान्यक्रम द्यावा. अशी धमकीवजा गळ घालण्यास सुरुवातही केली होती. त्याचाही परिणाम बच्चन पांडेवर झाला.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *