पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमक्या; पोलिसांत तक्रार दाखल

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची काही दिवसांपूर्वी झालेली संयुक्त पूर्व परीक्षा गट क देणाऱ्या विद्यार्थ्यांना धमक्या दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थांनी उत्तरतालिकेतील काही चुकांबाबत कोर्टात याचिका दाखल केली होती, यानंतर इतर विद्यार्थ्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत.

संयुक्त पूर्व परीक्षा गट क या परिक्षेच्या निकाला प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना काही विद्यार्थ्यांकडून याचिकाकर्त्यांना धमकी आणि सोशल मीडिया वरुन शिवीगाळ करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे, या संबंधी याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सदर विद्यार्थ्यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे.

संयुक्त पूर्व परीक्षा गट क देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची उत्तरतालिका चुकीच्या आल्याने यावर आक्षेप घेत कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे संयुक्त मुख्य परीक्षा गट क ची आगामी परीक्षा न्यायलाय प्रक्रियेमुळे रखडली. याचमुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या इतर परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून याचिका दाखल केलेल्या विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांना सोशल मिडीयावर शिवीगाळ करत धमक्या दिल्या जात आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply