पुण्यात मनसेला धक्का; वसंत मोरेंच्या खंद्या शिलेदाराचा पक्षाला रामराम?

पुणे: पुण्यात मनसेला धक्का बसला आहे. वसंत मोरे यांच्या खंद्या शिलेदाराने मनसेला रामराम ठोकला आहे. माथाडी कामगार सेनेचे माजी शहराध्यक्ष निलेश माझीरे यांनी मनसेला राजीमाना दिला आहे. त्यांनी फेसबुक पेस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. पुण्यात महाराष्ट्र नव निर्माण सेनेला हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे.

पुणे मनसेतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. वसंत मोरे हे गेल्या काही महिन्यापासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यामुळे वसंत मोरे मनसेतून बाहेर पडणार का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, पण राज ठाकरे यांनी वसंत मोरेंची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली होती, पण आता मोरे यांच्या खंद्या शिलेदाराने पक्षाला राजीनामा दिल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

निलेश माझीरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी पक्षाला राजीनामा देत असल्याचे सांगीतले आहे. 'आता वेळ आली कोणता तरी चांगला निर्णय घेण्याची, आज माझ्या कार्यकर्त्यांशी सर्वांची व्यवस्थित बोलणे झाले. मी स्वतःला समजूत घालू शकतो, कार्यकर्त्यांना किती समजून सांगणार. माझ्या बाबतीत जे काय चालय, ते मी दोनच दिवसांत फेसबुक लाइव्ह येऊन नावा सहीत जाहीर करणार आहे, जय, महाराष्ट्र, असं फेसबुक पोस्टमध्ये माझीरे यांनी म्हटले आहे.

निलेश माझीरे यांनी आज दुसरी फेसबुक पोस्ट केली. यात आता वेळ आली आहे चांगला निर्णय घेण्याची अस म्हटले आहे. 'आता वेळ आली कोणता तरी चांगला निर्णय घेण्याची, अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र 7.30 लाइव्ह येत आहे तयार रहा, अस या पोस्टमध्ये म्हटले आहे.

यावरुन पुण्यात मनसेत सुरू असलेला गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात सभा झाली. या दिवशीही पुणे मनसेत नाराज नाट्य सुरू झाले होते. आता पुन्हा मनसेतील नाराजी नाट्य समोर आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply