पुण्यात दस्तनोंदणी शनिवारी, रविवारीही सुरू

पुणे  - दस्त नोंदणीसाठी काही दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी व रविवारी सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच सकाळी साडेसात वाजल्यापासून ते रात्री पावणे नऊपर्यंत नागरिकांना दस्त नोंदणी करता येणार आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या सोयीच्या दिवशी तसेच सोयीच्या वेळेनुसार दस्त नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी दिली.

करोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षांपासून शनिवार व रविवारी सुरू असलेली कार्यालये बंद करण्यात आली होती तसेच सकाळच्या व दुपारच्या सत्रात सुरू असलेली असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वेळेत बदल करण्यात आला होता. सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सकाळी 09:45 ते 06:15 या वेळेत सुरू ठेवण्यात येत होती

आता, करोनाचे संकट कमी झाल्याने नागरिकांच्या सोयीसाठी दस्त नोंदणीची सुविधा शनिवार व रविवारी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मिळून 27 दुय्यम निबंधक कार्यालये असून यातील सात कार्यालयांच्या वेळेत बदल करण्यात आला असून उर्वरित कार्यालये सकाळी 09:45 ते 06:15 या वेळेत सुरू राहणार आहेत.

दुय्यम निबंधक कार्यालयाचे नाव - कार्यालयाची वेळ - साप्ताहिक सुट्टी

हवेली क्रमांक 10 - सकाळी 7:30 ते दुपारी 3.15 - शनिवार व रविवार

हवेली क्रमांक 11- दुपारी 1 ते रात्री 8.45 - शनिवार व रविवार

हवेली क्रमांक 17 - दुपारी 1 ते रात्री 8.45 - सोमवार व मंगळवार

हवेली क्रमांक 22 - दुपारी 1 ते रात्री 8.45 - बुधवार व गुरुवार

हवेली क्रमांक 23 - सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 - सोमवार व मंगळवार

हवेली क्रमांक 21 - सकाळी 7:30 ते दुपारी 3.15 - बुधवार व गुरुवार

हवेली क्रमांक 25 - सकाळी 7:30 ते दुपारी 3.15 - सोमवार व मंगळवार



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply