पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीन जिलेटीनच्या कांड्या पोलिसांनी घेऊन निकामी करण्याची कारवाई सुरू केली. रेल्वे स्टेशन परिसरात घबराट पसरली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला असून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलीय. बॉम्ब शोधक पथकाने मोकळ्या जागेत बॉम्ब सदृश वस्तू निकामी करण्यासाठी नेली आहे. फलाट क्रमांक एक परिसर रिकामा करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता घटनास्थळी दाखल झाले असून रेल्वे स्थानक परिसराचा ते आढावा घेत आहेत. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिकही घटनास्थळी दाखल झाले असून ते घडमोडींवर नजर ठेऊन आहेत.
“साडेदहा वाजता स्थानकावर संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती मिळाली. सध्या जिलेटिन नाही अशी माहिती आहे. पण तपासणी सुरु आहे. सध्या प्राथमिक माहिती आहे त्यामुळे जास्त सांगू शकत नाही. लोकांनी घाबरण्याचं कारण नाही,” असं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी म्हटलं आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब सदृश्य गोष्ट सापडल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सामान्यपणे दुपारी पुणे रेल्वे स्थानकात गजबजाट असणारे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामे करण्यात आलेत. प्रवाशांना सध्या तरी तेथे प्रवेश दिला जात नाहीय. जी संशयास्पद वस्तू आढळून आलेली ती जवळच्या मैदानात नेण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच प्लॅटफॉर्मवरील वाहतूक थांबवण्यात आलीय.
बॉम्ब पथकाच्या सहाय्याने संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरासाची तपासणी करायची की नाही, नेमकी ही वस्तू येथे आली कुठून यासंदर्भातील चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. स्टेशन मास्तर, रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची पुणे रेल्वे स्थानकामधील कार्यालयामध्ये बैठक सुरु असल्याचीही माहिती समोर येत आहे.
इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या उशीराने धावत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता. मात्र त्यानंतर तपासणी केली असता ही माहिती खोटी असल्याचं उघड झालेलं. त्यानंतर आज ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहर
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
महाराष्ट्र
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ रोजी धावणार; अवघ्या २ तासांत पार होणार प्रवास!
- एका युगाचा अंत! क्रिकेट विश्वाला धक्का, न्यूझीलंडचा दिग्गज केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती!
- अमिताभ बच्चनही ज्याच्या प्रेमात! १०० वर्षांची परंपरा असलेला 'सोहन हलवा'; पाकिस्तानातून थेट 'बिग बीं'साठी स्पेशल पार्सल
- अमरावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'फटका' देणाऱ्या गँगचा पर्दाफाश! कल्याण लोहमार्ग पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या

























Subscribe to my channel


