पुणे : 'Serum Institute'ची एक कोटी रुपयांची फसवणूक करणारे गजाआड, टोळीचा म्होरक्या फरार

पुणे : 'सीरम इन्स्टिट्यूट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसअॅप मेसेज पाठवून संस्थेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्यांना अखेर पोलिसांनी अटक केली. बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने बिहार येथे जाऊन धडक कारवाई केली.

मात्र, या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अद्याप पोलिसांच्या (Police) हाती लागलेला नाही. फसवणुकीची घटना 7 सप्टेंबर रोजी घडली होती. रविंद्र कुमार हुबनाथ पटेल (34,उत्तरप्रदेश),बिहारचा राजीवकुमार शिवजी प्रसाद (27),चंद्रभुषण आनंद सिंग (37) आणि कन्हैया कुमार संभू म्हानतो (22) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,'सीरम इन्स्टिट्यूट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसअॅप मेसेज पाठवून संस्थेची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना 7 सप्टेंबर रोजी घडली होती.याप्रकरणी सीरम इन्स्टिट्यूटचे फायनान्स अधिकारी सागर कित्तूर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कित्तूर हे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये फायनान्स व्यवस्थापक आहेत्न,तर सतीश देशपांडे कंपनीचे संचालक आहेत.

आदर पूनावाला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉटसअॅप मेसेज देशपांडे यांना आला होता.त्यात काही बॅंक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तत्काळ पैसे पाठविण्यास सांगितले.हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीच्या खात्यावरून विविध बॅंक खात्यांवर तब्बल एक कोटी एक लाख एक हजार 554 रुपये पाठविण्यात आले.मात्र,संबंधित प्रकाराद्वारे फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर कंपनीकडून पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली. या प्रकरणाचा तपास बंडगार्डन पोलिसांकडून सुरु होता.

त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बिहार येथील आरोपींनी हा गुन्हा केल्याचे उघडकीस आले.त्यानुसार,पोलिसांच्या पथकाने त्यांना बिहारमध्ये जाऊन अटक केली.फसवणूक करुन मिळविलेले पैसे चार जणांनी त्यांच्या बॅंक खात्यावर मुल्यवर्धीत कराचे पैसे आल्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,पोलिस निरीक्षक (गुन्हे)अश्निनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply