पुणे – PMPL च्या बसेस महापालिका आणि खासगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देणार

पुणे - पीएमपीच्या ताफ्यात अतिरिक्त बस असल्याने आता यातील सुमारे २५० ते ३०० बस थेट इतर महापालिका व खासगी कंपन्यांनाच भाड्याने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यातून पीएमपीला उत्पन्न मिळून त्यांची संचलनातील तूट कमी होईल असा दावा केला जात असला तरी आणीबाणीच्या काळात किंवा बस ठेकेदारांनी संप केल्यानंतर पुणेकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पीएमपीच्या बसेस सोलापूर व कोल्हापूर महापालिकांना भाड्याने दिल्या जाणार आहेत. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायरण मिश्रा आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

एसटी संपाच्या काळात पीएमपीने पुणे जिल्ह्यातील बस फेऱ्या वाढविल्या, काही नवीन मार्ग सुरू केले होते. आता एसटीचा संप संपल्याने या बसची सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply