पुणे : ‘स्टारबक्स कॅफेही दुपारी १ ते ४ बंद ठेवा’, सीईओ होताच लक्ष्मण नरसिंहन यांना पुणेकरांचा सल्ला, ते म्हणाले “असं अजिबात होणार नाही”

पुणे : कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या स्टारबक्स कॉर्पने लक्ष्मण नरसिंहन यांची आगामी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. लक्ष्मण नरसिंहन मूळचे पुण्याचे असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे पुणेकर प्रचंड आनंदी असून, सोशल मीडियावर तर मीम्सची लाटच आली आहे. लक्ष्मण नरसिंहनदेखील अभिमानाने मी पुणेकर असल्याचं सांगतात. सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी आपल्या नियुक्तीनंतर पुणेकरांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

मुलाखतीदरम्यान त्यांनी तुम्हाला विश्वास बसणार नाही असे सल्ले मला भारतातून येत आहेत असं सांगितलं. “मी काय केलं पाहिजे, यासाठी मला खूप सल्ले दिले जात आहेत. मी पुण्याचा असून तिथे सर्व दुकानं दुपारी १ ते ४ या वेळेत बंद असतात. त्याच्या सन्मानार्थ मीदेखील १ ते ४ कॅफे बंद ठेवावेत असा सल्ला देत आहेत. पण तसं होणार नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे .

सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेले नरसिंहन हे त्याआधी अमेरिकेत सिएटल येथे स्थलांतरित होतील. दरम्यान नरसिंहन यांच्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय वंशाच्या व्यवसाय प्रमुखांच्या वाढत्या यादीत एका पुणेकर व्यक्तीचा समावेश झाला आहे.

लक्ष्मण नरसिंहन यांचा परिचय –

पुण्यात जन्मलेले आणि शिक्षण घेतलेले नरसिंहन यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. पुढे त्यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिटय़ूटमधून जर्मन आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास या विषयातून एमए आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या द व्हार्टन स्कूलमधून वित्त व्यवस्थापनाची पदवीही प्राप्त केली आहे. स्टारबक्सने त्यांच्या नियुक्तीसंबंधी निवेदनात, थेट ग्राहकांना तोंड देणाऱ्या जागतिक नाममुद्रांच्या नेतृत्व आणि सल्ला देण्याचा नरसिंहन यांच्याकडे जवळपास ३० वर्षांचा अनुभव आहे, असे नमूद केले आहे.

‘अविरत प्रवाह’

नव्या नियुक्तीसह लक्ष्मण नरसिंहन हे मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अ‍ॅडोबचे शंतनू नारायण, अल्फाबेटचे सुंदर पिचई आणि ट्विटरचे प्रमुख पराग अग्रवाल यांच्यासह अमेरिकास्थित जागतिक आघाडीच्या कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या व्यक्तीची नेतृत्वपदी वर्णी लागण्याच्या वाढत्या गौरवास्पद सूचीत सामील झाले आहेत. इंद्रा नूयी यांनी २०१८ मध्ये पायउतार होण्यापूर्वी १२ वर्षे पेप्सिकोच्या मुख्याधिकारी म्हणून काम केले होते. मिहद्र समूहाचे अध्यक्ष आनंद मिहद्र यांनी गुरुवारी ट्वीटद्वारे स्टारबक्सवरील नियुक्तीबद्दल नरसिंहन यांचे अभिनंदन करताना, ते एका ‘अविरत प्रवाहा’चा भाग बनल्याचे नमूद केले. ‘थेंबे थेंबे सुरुवात झालेला हा प्रवाह आता त्सुनामी लाटेत बदलत चालला आहे आणि जगातील सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती हा आता न थांबवता येणारी गोष्ट बनली आहे,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.

ब्रिटनस्थित रेकिट बेंकिसर या ग्राहक आरोग्य, स्वच्छता आणि पोषण क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ५५ वर्षीय नरसिंहन हे कार्यरत होते. लायझॉल जंतुनाशक ते डय़ुरेक्स कन्डोम बनविणाऱ्या या कंपनीच्या प्रमुख पदावरून पायउतार होत असल्याचे आदल्या दिवशी नरसिंहन यांनी जाहीर केले आणि लंडनच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध या कंपनीच्या समभाग मूल्यात त्या परिणामी ४ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. प्रत्यक्षात ते ३० सप्टेंबपर्यंत रेकिटच्या प्रमुखपदी कायम असणार



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply