पुणे – साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणामुळे वाहनांच्या खरेदीला ‘अच्छे दिन’

पुणे - साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या  दिवशी वस्तू खरेदी शुभ मानली जाते. हा मुहूर्त साधून अनेक जण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदी करतात. यामुळे येत्या २ एप्रिल रोजी असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहने घरी घेऊन येण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग सुरु असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षीही नागरिकांना वाहन खरेदीचा मुहूर्त साधता आला नाही. यंदा मात्र वाहन खरेदीसाठी नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल असल्याचे शहरातील विक्रेत्यांनी सांगितले. गुढीपाडवा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वाहनांच्या आगाऊ बुकिंगसाठी नागरिक विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये गर्दी करू लागले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) वाहन नोंदणी ऑनलाइन केली आहे. त्यामुळे नोंदणीसाठी आता वाट पाहावी लागत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पेट्रोल, डिझेल दरवाढ ही सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे नागरिक आता इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply