पुणे येथील ससून रुग्णालयातील किडनी दानाची प्रक्रिया थांबवली

पुणे - 'मूत्रपिंड (किडनी) (Kidney) मिळण्यासाठी एक-दोन नाही, तर तीन-तीन वर्षे वाट बघितली. पण, मूत्रपिंड मिळाले नाही. अखेर घरातील नातेवाईक पुढे आले आणि मूत्रपिंड दानाची प्रक्रिया (Donation Process) सुरू झाली. पण, आता ती प्रक्रिया थांबण्याचा धोका (Danger) निर्माण झाला आहे. आता करायचे काय,' असा सवाल रुग्णांच्या नातेवाइकांनी गुरुवारी केला.

पुण्यात मूत्रपिंड दान करण्यासाठी १५ लाख रुपयांचे आमिष दाखविण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष पैसे न मिळाल्याने संबंधित महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयाची अवयव प्रत्यारोपण मान्यता निलंबित केली. तर, वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून रुग्णालयातील अवयव मूत्रपिंड प्रत्यारोपण समितीचा कारभार स्थगित केला. या पार्श्वभूमिवर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची समस्या गंभीर झाल्याची माहिती पुढे येत आहे.

मधुमेह आणि आनुवांशिकता या प्रमुख कारणांमुळे रुग्णाच्या मूत्रपिंडाचे कार्य थांबते. अशा रुग्णांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा डॉक्टर सल्ला देतात. (मेंदूचे कार्य थांबल्यानंतर) ‘कॅडॅव्हरिक’ मूत्रपिंड मिळण्यासाठी अनेक वर्ष लागतात. त्यात रुग्णाची प्रकृती खालावते. त्यानंतर अवयवदान करून मूत्रपिंड मिळत नाही. अशा वेळी रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी जवळच्या नातेवाइकाला पुढे येऊन मूत्रपिंड दान करावे लागते. या प्रक्रियेत गोंधळ झाला आहे. त्याबाबत नातेवाइकांनी ही भावना व्यक्त केली.

मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांमध्ये काही जण हे घरातील कमावती व्यक्ती आहेत. त्यांच्या आयुष्याचं बरं-वाईट झाल्यास त्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला बसण्याचा धोका आहे. त्यामुळे मूत्रपिंड प्रतीक्षा यादीत रुग्णाचे नावदेखील नोंदविले आहे, असेही नातेवाइकांनी सांगितले.

पुण्यामध्ये एक हजार ४७० रुग्ण मूत्रपिंडाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत. त्यापैकी चार वर्षांमध्ये २३८ रुग्णांना दान केलेले मूत्रपिंड मिळाले आहे. यात २०१९ मध्ये सर्वाधिक म्हणजे ८९ मूत्रपिंड रुग्णांना मिळाली. गेल्या वर्षभरात ३८ रुग्णांना मेंदूचे कार्य थांबलेल्या रुग्णाचे मूत्रपिंड मिळाले. यावर्षी गेल्या तीन महिन्यांमध्ये ४१ नातेवाइकांनी रुग्णांच्या मरणोत्तर मूत्रपिंड दान करण्यास परवानगी दिली.

सर्व वैद्यकीय तपासण्यांमधून रुग्णाच्या रक्ताशी संबंधित नात्यातील एखाद्या नातेवाइकाचे मूत्रपिंड रुग्णाशी जुळते. त्यावेळी नातेसंबंधांमध्ये प्रत्यारोपण होते. त्यासाठी ससून रुग्णालयाच्या समितीची मान्यता आवश्यक असते. त्यानंतर रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होते.

मेंदूचा कार्य थांबलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयवदानास परवानगी दिल्यानंतर मूत्रपिंड ज्या रुग्णाच्या मूत्रपिंडाशी वैद्यकीयदृष्ट्या जुळले जाते, त्या रुग्णाला प्रत्यारोपित केले जाते. सर्व प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य ‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन कमिटी’ (झेडटीसीसी) करते.

अवयवांची प्रतीक्षा यादी

मूत्रपिंड - १,४७०

यकृत - ८००

हृदय - ६४



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply